@konkaniranmanus
जगासाठी फणस हे इतर झाडांसारखेच केवळ एक फळझाड असेल पण आमच्या साठी फणस म्हणजे देवाचे झाड आहे...
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील माणसे वर्षाला एक झाड देवाला देण्यासाठी स्वतःच्या जागेत कितीतरी फणस झाडे राखतात ..जपतात..माझा गिरोबा माझ्या दारात वाढतो आहे ह्या श्रद्धा भावाने झाडे जपणारी माझी साधी भोळी माणसे , गीरी च्या नाथाला पुजून त्याच्या झऱ्याचे पाणी न्हावन म्हणून वाटतात.. अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार एकत्र मिळून भल्या मोठ्या फणसाच्या जुन्या झाडाला शिव लिंगाचा आकार देऊन देवतेच्या रुपात देवळा कडे घेऊन येतात ,यंदा मी ही ह्या सोहळ्याचा भाग बनलो होतो...देवाला खांदा देण्यासाठी गावातले तरुण पुढे सरसावतात..ती ऊर्जा , तो क्षण ढोलानी निर्माण केलेले ध्वनी आणि तरंग एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातात...मोह माये पलीकडे ...कुठून येते इतकी ताकद कुठून येतो इतका आत्मविश्वास ... आनंदाच्या ह्या लहरित स्वतःला झोकून द्यायचे बस..कसलीच चिकित्सा न करता निसर्ग देवते पुढे हात जोडून निर्मात्या पुढे नत मस्तक व्हावे...❣️🙏
आपल्या एखाद्या जिवलग मित्राशीच बोलावे इतक्या अधिकाराने आम्ही देवा पुढे गाऱ्हाणे मांडू शकतो कारण आमचा देव पुजाऱ्यानी वेढा घातलेल्या श्रीमंत देवस्थानात राहत नाही ..आमचा देव इथलेच फणसाचे झाड आहे..आमचा देव साध्या कौलारू मंदिरात राहतो...आम्ही मायेने त्याला "गिरोबा" म्हणून हाक मारतो...हा साधेपणा जपायला हवा...देव जपणारी माणसेही जपायली हवीत आणि संस्कृतीही
आम्हाला जीवन देणारे डोंगर झरे ही निसर्गाची रूपे म्हणजेच आम्हा कोकणी रान माणसांचा देव अशी सदभावना मनात असेल तरच माणसांचा देव म्हणजेच निसर्ग ही देव रहाटी निर्माण करण्या मागची खरी संकल्पना जपली जाईल.. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात राहणारे लोक, भोळ्या शंकराचे खरे भक्त...तळ कोकण आणि गोव्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या तेरेखोल नदीच्या खोऱ्यातील सांगेली गावातील गिरोबाचे पारंपारिक कौलारू मंदिर हे
फणसाचे शिवलिंग असलेले देशातील एकमेव शिवमंदीर आहे..पैश्याच्या हव्यासा साठी सह्याद्रीत जंगलतोड वाढत असताना गावात देवसाठी फणस जपण्याच्या ह्या परंपरे मुळे ह्या गावात मात्र लोक झाडे जपत आहेत...अशी देवाची झाडे जपण्याची संस्कृती कोकणातल्या गावा गावात आहे त्या मागचा संवेदनशील पर्यावरण संवर्धनाचा हेतू मात्र हरवता कामा नये...🙏