कोकण ही महाराष्ट्रातील ७२० किमीची अरुंद अशी किनारपट्टी आहे, जिच्यां पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला समांतर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. येथील जैवविविधता, परंपरा, पाककृती आणि भाषांमध्ये कोकणाचे वेगळेपण आहे. कोकण विभाग सात जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे.
अलिबाग, मुरूड जंजिरा, किल्ले सिंधुदुर्ग, श्रीवर्धन, गुहागर, गणपती-पुळे अशी बोटावर मोजण्याइतकी चार-दोन ठिकाणे म्हणजे कोकण-दर्शन नाही. पर्यटन म्हणून एखादे ठिकाण विकसित होण्यासाठी निसर्ग, ऐतिहासिक वारसा, ग्रामसंस्कृती या तीन गोष्टी आवश्यक असतात. या सर्व गोष्टींचा मिलाफ कोकणामध्ये आहे. हे असूनही कोकणचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तसा विकास झाला नाही आणि जो झाला तो फक्त ठराविक ठिकाणांपुरताच मर्यादित राहिला.
नवलाई धबधबा, काताळे जेट्टी, पाजपांढरी, केळशी, वेळास, आवास अशी अनेक ठिकाणे पर्यटकांपासून अजूनही दूर आहेत. या ठिकाणांची माहिती पर्यटकांना होण्यासाठी आणि "न पोचलेले' कोकण जगासमोर येण्यासाठी या पेजची निश्चितच मदत होईल.
या न्यूज पोर्टलद्वारे विविध घडामोडी, उपयुक्त माहिती, आरोग्य, मनोरंजन, लाईफस्टाईल या विषयांसंदर्भात अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.