कोकण आयडॉल. -. महेश सानप
साहसी पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशमध्ये लाखो पर्यटक जातात. आता भविष्यात कोकणातील सह्याद्री मध्ये लाखो पर्यटक येतील आणि या अभियानाचा शिल्पकार आहे महेश सानप. गेली पंचवीस वर्ष कोलाड च्या कुंडलिका नदीमध्ये हा युवक कोकण विकासाची तपश्चर्या करतोय. सुरुवातीला
वाहत्या पाण्यातील राफ्टींग हा प्रकार धरणातून सोडलेल्या पाण्यावर महेशने सुरू केला. आज वर्षाला पंधरा वीस हजार पर्यटक केवळ राफ्टींग साठी कोलाड मध्ये येतात. इतक्यावरच न थांबता नदीमध्ये साहसी पर्यटनाचे अनेक प्रकार महेशने सुरू केले. कयाकिंग, वॉटर स्कूटर, विविध राईड्स, 12 किलोमीटर ,आठ किलोमीटर ,पाच किलोमीटर
व्हाईट वॉटर राफ्टिंग, लाईव्ह धबधब्यांमध्ये रॅपलिंग, वॉटर फॉल एडवेंचर्स, रिव्हर टुरिझम नदी पर्यटन... म्हणजे काय
हे महेशने कोकणात सिद्ध करून दाखवले. गेली पंचवीस वर्ष महेश करतोय, आणि आज हजारो पर्यटक हा अनुभव घेण्यासाठी आपल्या कोकणात म्हणजे कोलाड मध्ये येतात.
अतिशय उच्च दर्जाचे पर्यटक आणि पर्यटन या परिसरात विकसित झाले आहे. भरपूर शिकलेले उच्च विद्याविभूषित
पर्यटनाची आवड असलेले पर्यटक खऱ्या अर्थाने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येथे येतात. दोन बोटी घेऊन सुरू झालेला हा प्रवास आज या परिसरात 72 रिसॉर्ट आहेत. आणि एक हजारहून अधिक रूम आहेतः. सुट्टीच्या दिवशी 4 ते 5 हजार पर्यटक कोलाड परिसरात येतात राहतात आणि विविध पर्यटनाचा आनंद घेतात. प्रचंड मोठी अर्थव्यवस्था पर्यटनातून या परिसरात विकसित झाली आहे. या परिसरातल्या शेकडो युवक-युवतींना या उद्योगातून व्यवसाय मिळाला आहे. सुरसा उपयोग आजूबाजूच्या गावातील आणि कोकणातील अनेक युवक आणि युवती ना महेशएकटा रोजगार मिळवून देतो. ही जादू महेश सानप सारख्या एका कोकणातील तरुणाने केली आहे. त्याचे काम पाहून मी अक्षरशः भारावून गेलो.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बंजी जम्प हा जगभर दिसणारा पर्यटनाचा प्रकार महाराष्ट्रात आणि कोकणात महेशने पहिल्यांदा सुरू केला. याकरता एका विदेशी कंपनीने महेश बरोबर हातमिळवणी आणि 45 मीटरचा जागतिक दर्जाचा पर्यटनाचा प्रकार महेशने कोकणात सुरू केला. भरपूर पगार घेणारी कार्पोरेट क्षेत्रातील तरुणाई ही आत्ता कोकणात पर्यटनासाठी आकर्षित झाली आहे आणि याचे संपुर्ण श्रेय महेशला द्यावे लागेल.
या वर्षी 27 मार्चला ग्लोबल कोकणच्या वतीने कोकण आयडॉल हा पुरस्कार आपण महेशला देणार आहोत.
याच साहसी पर्यटनाची दुसरी बाजू कोकणात जेव्हा महाडला महापूर झाला त्यावेळी आपल्या टीमला आणि बोटी घेऊन महेश रात्रीच्या रात्री लगेच महाडमध्ये केला. सरकारी डिझास्टर मॅनेजमेंट NDRLF कधी येईल याची वाट न पाहता हजारो लोकांना पुराच्या पाण्यामध्ये वाचवण्याचे काम महेश च्या बोटी आणि त्याच्या सेंटरमधील त्याच्या टीमने केले. NDRLF जी देशाची संस्था डिझास्टर मॅनेजमेंट चे काम करते ही संस्था त्यांच्या जवानांना ट्रेनिंग देण्यासाठी महेश कुंडलिका नदीवरच्या सेंटरवर येऊन आपले प्रशिक्षण केंद्र सुरु करते. NDRLF चे प्रशिक्षण केंद्र महेश च्या कुंडलिका रिवर च्या सेंटर वर सुरू आहे.
आज कोकणचे स्वतःचे स्वयंभू आणि स्वयंसेवी डिझास्टर मॅनेजमेंट विकसित झाले आहे. रायगड जिल्ह्यात सह्याद्रीमध्ये किंवा नद्यांमध्ये कोठेही मोठे अपघात झाले तर महेशची टीम काम करते.
पर्यटनाचे एक डेस्टिनेशन संपूर्ण विकसित करण्याची काम
आणि एक सक्सेस स्टोरी लोकसहभागातून महेश सानप या तरुणाने सिद्ध केली आहे.
थायलंड इंडोनेशिया बाली स्विझर्लंड फार लांब कशाला आपल्या देशात हिमाचल प्रदेश येथे साहसी पर्यटन विकसित झाले आहे. या देशांचे पर्यटन आणि अर्थव्यवस्था या भोवती फिरते. जगभरातील पर्यटक येथे या पर्यटनासाठी येतात. भविष्यात असे पर्यटन कोकणात आपल्या समुद्रकिनाऱ्यांवर आणि सह्याद्रीमध्ये विकसित होईल. यात सह्याद्रीचे उंच कडे धबधबे नद्या समुद्र यांचा उपयोग होईल
हे सर्व अभियान पुढे नेण्यासाठी महेश सानप यांचा पुढाकार असेल. ग्लोबल कोकण आणि समृद्ध कोकण प्रदेश संघटना
यांचा सातत्याने संपूर्ण सहभाग या अभियानात राहील.
लवकरच या विषयात एक विशेष सेमिनार आपण कुंडलिका रिवर मध्ये महेश सानप सोबत आयोजित करू.
पुन्हा एकदा कोकण विकासाची प्रचंड चेतना आणि उर्जा निर्माण करणाऱ्या महेश सानप या तरुणाला आणि त्याच्या कर्तुत्वाला सलाम !
संजय यादवराव
समृद्ध कोकण प्रदेश संघटना
ग्लोबल कोकण