पुन्हा कोकणाच्या अल्पपरिचयाकडे...
कोकणातील उत्सवकोकणातील लोक हे उत्सवप्रिय आहेत. ही उत्सवप्रियता त्यांच्या संस्कृतीत खोलवर रुजली आहे आणि महाराष्ट्रीय दिनदर्शिकेवरील विविध औचित्यांमधून तसेच नृत्य, स्वादिष्ट पदार्थ आणि उत्सव यांतून ती व्यक्त होत असते.
गुढीपाडवा एक भारतीय सण आहे. तो दिनदर्शिका प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिवशी नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी, नवीन व्यवसाय प्रारंभ, वस्तू खरेदी इत्यादी काही गोष्टी केल्या जातात. दारीसमोर उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांचा प्रारंभ होतो.
गुढीपाडवा इतिहास. ( History of Gudi Padawa in marathi )
गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. असे म्हटले जाते की महाराष्ट्राच्या आदिपर्वात उपरिचर राजाने, इंद्राने त्याला दिलेली कळके ची काठी जमिनीत रोखली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली या परंपरेचा आदर राहण्यासाठी गोडी पूजन केले जाऊ लागले. गुढीपाडवा का साजरा करावा या मागच्या अनेक कथा आपल्याला सांगितल्या आहेत. त्यापैकी एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरला आणि तृतीयेला त्यांचं लग्न झालं. म्हणून म्हणून या दिवशी आदिशक्ती माता पार्वतीची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार श्री राम वनवासाचा काळ पूर्ण करून पुन्हा आयोध्या ला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.
घरोघरी उभारली जाणारी गुढी.
नववर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो.त्याची पूर्वतयारी म्हणून खेडेगावात गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी जवळच्या शेतातून केव्हा रानातून(जंगलातून) बांबू तोडला जातो. तू घरी आणून स्वच्छ धुतला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील सर्व मंडळी पहाटे लवकर उठून गुढी उभारण्याच्या कार्यक्रमासाठी तयारी करत असतात. उंच बांबूच्या काठीला कडू लिंबाच्या झाडाची डहाळी किंवा आंब्याच्या झाडाची डहाळी, काठीच्या वरच्या टोकाला नवीन नवीन रंगांचे अथवा साडी गुंडाळतात. फुलांचा हार आणि साखरेची पुडी बांधून त्यावर तांब्या किंवा कोणतेही भांडे बसवले जाते. फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. गुढीची बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी दारासमोर किंवा कर गच्चीवर उभारली जाते.
उभारलेल्या गुढीची सकाळी पूजा केली जाते. गंध फुले अक्षता वाहून निरंजन लावून अगरबत्ती दाखवतात. धुपाचा सुगंधी वास पूर्ण घरभर दरवळत असतो. गोड-धोड नैवेद्य बनवला जातो. संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरली जाते. त्या दिवशी आनंदी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना लहान थोरामोठ्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा | गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. शुद्ध प्रतिपदा हा दिवस गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात म्हणजेच कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यात स्वातंत्र्यप्राप्ती चा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून स्वस्त पाडवा वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. मुख्यता महाराष्ट्रातल्या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.
पारंपारिक वेशभूषा आणि गुढीपाव्यानिमित्त शोभायात्रा.
गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. म्हणूनच नवीन वर्षाच्या आगमनासाठी पारंपारिक देशभूषण ने केले जाते. शहरांमध्ये तसेच खेडेगावात महिला आणि पुरुष वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र परिधान केलेले आढळतात. महिला या दिवशी खास करून नऊवारी साडी, काटापदराची साडी, काष्टी साडी, गोल साडी त्यावर नाथ, ठुशी , हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये दागिने घालतात, तर पुरुष मंडळी धोती कुर्ती सलवार पारंपारिक पेहराव करत असतात. तसेच लहान मुलांना आवडेल ते कपडे घालून सणाचा आनंद घेत असतात.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी सार्वजनिक पद्धतीने सुद्धा गुढीपाडवा साजरा केला जातो. यामध्ये बिल्डिंग चाळ सार्वजनिक कार्यालयासमोर एकत्रित गुढीपाडवा साजरा करतात. चाळी बिल्डिंग किंवा रस्त्यावर चौकाचौकात मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. यामध्ये पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केलेले महिला, पुरुष , तसेच लहान मुले एकत्र येऊन लेझीम, ढोल, ताशे आणि भव्यदिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते. खेडे गावांसह शहरात देखील सर्व समाजातील लोक यात सहभागी होऊन शोभायात्रेची शोभा वाढवतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात.
गोमुचा नाच.
कोकण म्हटलं की परशुरामाची भूमी. पारंपरिक पद्धतीने साजरे करणारे सण, महोत्सव. जीवनाला अध्यात्म आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या भक्तीभावाचा स्पर्श ठेवणाऱ्या सर्वच सणाना देवकल्पना आणि कथाकल्पणांची जोड दिली आहे त्यामुळे इथले सण धार्मिक भावनेने आणि श्रद्धेने साजरे केले जातात. त्यातीलच एक पद्धत म्हणजे गोमुचां नाच. याचा उल्लेख भगवान श्रीकृष्ण यांच्या कथेमध्ये आढळतो. गोमुचा नाच ही पारंपरिक पद्धत आहे. यामुळे देवावरची श्रद्धा, निष्ठा आपल्याला पाहायला मिळते.
गोमूचा नाच म्हटलं की कसं लगेच चेहऱ्यावर गोमुच दृष दिसत आणि गोड हसू देखील येत.. अश्याच गोमुच्या नाचण्याची परंपरा ही महाराष्ट्रात काही ठिकाणी जोपासली जाते.शिमग्यापासून ते गुढी पडव्यापर्यांत हा गोमूचा खेळ वड्या वाड्यात चालतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी खेडेगावातील लहान मोठी मंडळी एकत्र येऊन गोमुची तयारी करतात. गोमुला साजऊन नटून तयार केली जाते. मग पूर्ण गावभर गोमूची गाणी म्हणत सर्व गावातील मंडळी गोमूच्या खेळत रमले जातात...
गोमुची गाणी.
गोमूचा हा नाच आला. शिमगा घाला..
बघायला पोरांनी गळका केला.!!
चार बाजूला चार कोळी. हातामध्ये वल्हे..
काटीच्या टोकाला बसवले, छानच रंगवलेले..
मध्ये देहुडा, निळ्या मुखाचा, मोहन मुरलीवाला.
गोनुचा नाच आला . शिमगा घाला...!!
टाळ वाजतो छन छन ,
पोरं नाचती धन धन.
पारंपरिक गोमू गाणी चौपाटी बंधराला
गोमुचा नाच आला. शिमगा घाला..!!
गिरक्या घालुनी उलटे सुलटे,
हुप हुल करुनी भिविती सगळे.
शिट्या मारुनी नाच संपूनी सारे जाती पुढच्या दाराला.
गोमूचा नाच आला शिमगा घाला.!!!
आरत घेऊन कोण गोमू आली हो
आर त घेऊन कोण गोमू आली...
घरा दाराची लक्ष्मी आली हो,,
घरा दाराची लक्ष्मी आली...
पाच वाती पंच्या आरती,
गोमूला नाचवा ओवाळू आरती..!!