नेहमीच दुर्लक्षित राहिलेले, वैराण आणि शुष्क म्हणून हिणवलेले कोकणातील कातळ सडे हे तळ कोकणातील कित्येक नद्यांचे उगम स्थान आहेत..म्हणूनच सडे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील आहेत..
जगप्रसिद्ध हापूस काजू आणि कोकणी रान मेवा ह्याच कातळ सड्यांची देणगी आहे..
अश्याच एका सड्यावर च्या जंगलातले अमृत तुल्य पाणी स्थानिकांनी देवराई तले पाणी म्हणून श्रद्धेने जपले आहे..
ह्या श्रद्धेमुळेच दुर्मिळ असे सड्यावरचे जंगल आणि पाणथळ जागा (Wetland) संरक्षित राहिली आहे..
एका स्थानिक प्राण्याच्या नावाने जपलेली ही म्हणजे कोकणी संस्कृती तील माणूस प्राणी ह्यांच्यातील नात्याचे गोड फलित आहे 🙏
-Konkani Ranmanus